Google
 

Saturday, June 14, 2008

टपरी
सन्ध्याकाळची वेळ, सगळे जमायचो,
काँलेज सुटलेकी इकडेच यायचो,
वरती छत नाही, फ़टक्या भीन्ति, दोन चार तुटक्या बाकडी,
अश्या तुटक्या फ़ुटक्या विसाव्याच्या जागेला अम्ही 'टपरी' म्हणायचो.

पास, नापास तर कधि अभ्यासाला न्याय,
शेरो शयरी टवाळक्या तर कधी प्रेमचे अध्याय,
ह्या सगळ्या गोष्टिऩ्वर एकच उपाय,
सिगारेट का धुआ और उधार की चाय.

मुव्हि, नाटक, पिकनिकचे तर प्ल्यान बनवीले डिस्कोथेकचे,
कधि बर्थडे बम्प्चे तर अस्वाद घेतले कधि केकचे,
इथेच पराक्रम केलेत आम्ही पोरगी पटविण्याचे,
तर भान्डणात नकाशेही बदलीविलेत अनेकान्चे.

उन्हाळे, पावसळे,हिवाळे गेले,
आणी टपरी प्रेम आमचे वाढतच गेले,
पण एक दिवस टपरी सोडावी लागेल,
या विचाराने मन रडू लागले.

वेळ बदलला काळ बदलला, मीत्रान्चा आता साथ सुटला,
मनात इथली फ़क्त आठवण आहे,
आम्ही नसलो तरी काय झाले,
टपरी अजुणही तशीच सदाबहार आहे

तुला नकार दिल्यावर.....

तुला नकार दिल्यावर कलाल मला
खर प्रेम काय असत
आणि मज मन वेडच झाल

apron मला romio चा coat च वाटला
buret मधल NaOH च solution तुज्य डोल्याताले अश्रू आठवून गेल
conical flask burner ने heat करताना वाटल ....
तुही असा जळत नसशील ना विराहाच्या अग्नित

bio मध्ये heart observe करताना वाटल
मी तुज्या heart चे पण असे तुकडे तुकडे तर केले नाहीत ना....
slide मधल्या bacteria सारखा मन वलवालू लागल
prwan सारख hard मन sycon सारख soft झाल

physics मध्ये reading घेताना वाटल .....
मी तुज मन read करायला पाहिजे होत
पण म्हणतात ना प्रत्येक instrument मध्ये error हा असतोच
तसा त्याचाताही होता
मी त्याचात अदकत असताना
तो मात्र "ये नहीं तो और सही " म्हणत होता
आता मात्र ठारावल
प्रेम म्हणजे काय असत?
जे कधी करायच नसत
केल्यावर मग रदायाचा नसत
असल्या नसत्या धंद्यात पदायाचा नसत

नंतर कलाल तो माझा गैरसमज होता
त्याच plan success झाल
पण माझ्या डोलाना पानावल
अणि नंतर हळूच जवळ येवून म्हानतल
वेडू बाईच शहन्पण कलल
म्हनून म्हणतात ना
प्रेम म्हणजे काय असत
वायफल जायफल काहीही नसत
अकशातल ते चांदन असत
आयुष्याचा वाटे वरची साथ असत

पहिला पाऊस

पहिला पाऊस पडतो तेंव्हा
एकच काम करायचं...
हातातली कामं टाकुन देउन
पावसात जाऊन भिजायचं!

आपल्या अंगावर झेलून घ्यायच्या
कोसळणार्‍या धारा
श्वासांमध्ये भरून घ्यायचा
सळाळणारा वारा

कानांमधे साठवुन घ्यायचे
गडगडणारे मेघ
डोळ्यांमध्ये भरुन घ्यायची
सौदामिनीची रेघ

पावसाबरोबर पाऊस बनून
नाच नाच नाचायचं
अंगणामधे, मोगर्‍यापाशी
तळं होऊन साचायचं!

आपलं असलं वागणं बघुन
लोक आपल्याला हसतील
आपला स्क्रू ढिला झाला
असं सुध्दा म्हणतील

ज्यांना हसायचं त्यांना हसू दे
काय म्हणायचं ते म्हणू दे
त्यांच्या दुःखाच्या पावसामधे
त्यांचं त्यांना कण्हू दे

असल्या चिल्लर गोष्टींकडे
आपण दुर्लक्ष करायचं!
पहिला पाऊस एकदाच येतो
हे आपण लक्षात ठेवायचं!

म्हणून...
पहिला पाऊस पडतो तेंव्हा
एकच काम करायचं...
हातातली कामं टाकुन देउन
पावसात जाऊन भिजायचं!
स्वप्न दाखवून स्वप्न तोडतेस तू,
डोळ्यातून अश्रु काढतेस तू,
अन् पुन्हा तेच पुसायलाही येतेस तू,
अशी कशी ग तू.... अशी कशी ग तू....