Google
 

Wednesday, November 28, 2007

अलौकिक क्षण……

एक सुप्रभात होई हर्ष हर्ष…
अंगावरती एक मधुर स्पर्श…

बागेत एक निर्मल तुषार्…
भिजण्यासाठी पक्षी तयार…

पाण्यामध्ये एक श्वेत कमल…
किलबिल किलबिल चंचल मीनल…

फ़िरे मुक्त मुक्त स्वच्छंद कोणी…
पानांवरती थिजलेले मणी…

फ़ुलपाख़रांसवे उडे पराग कण…
असला हा एक अलौकिक क्षण…
असला हा एक अलौकिक क्षण…

- पराग
Original post from:
http://www.orkut.com/CommMsgs.aspx?cmm=826350&tid=2568735923763693700&start=1

No comments: