Google
 

Friday, June 29, 2007

Garava dialogs...सर्व गारवाप्रेमींसाठी
हेच ते शब्द जे मनाला भिडतात,
मनात खोलवर रुतुन बसतात..
जुन्या आठवणींना उजाळा देतात..
अन.....
आयुष्यातले सारेच पावसाळे डोळ्यांसमोर उभे करतात!!!!

Wednesday, June 27, 2007

पुन्हा ढग दाटून येतात, पुन्हा आठवणी जाग्या होतात...
तिचे माझे सारेच पावसाळे, माझ्या मनात भिजून जातात...
पुन्हा पाऊस ओला ओला, पुन्हा पाऊस बांधून झूला...
तिच्याकडले उरले झोके, परत करतो माझे मला...
पुन्हा पाऊस खूप ऐकतो, पुन्हा पाऊस खूप बोलतो...
त्याच्या माझ्या गप्पांमधले तिचे थेंब अलगद झेलतो...
पुन्हा पावसाला सांगतो मी, पुन्हा पावसाशी बोलतो मी...
माझे तिचे आठवण थेंब, पुन्हा पावसालाच मागतो मी..
आयुष्य नक्की काय असतं ?
हासर्या फ़ुलावरचं दव असतं..
नाचर्या मुलाचं नाच असतं..
दुखर्या ह्रुदयाचा घाव असतं..

आयुष्य नक्की काय असतं,
समुद्रात चाललेलं दिशाहिनं जहाजं असतं,
किनारा शोधत फ़िरायच असत,
वादळांनी डगमगुन जायचं नसतं.

आयुष्य नक्की काय असत?
ते एक तलम रेशमी वस्त्र असत..
ज्याचे त्यानेच ते विणायच असतपण,
अति ताणायच नसत..

आयुष्य नक्की काय असत?
सतत गुन्तत जाणारे ते एक कोडे असत,
ते ज्याचे त्यानेच सोडवायच असत,
गुन्तून मात्र त्यात पडायच नसत !!
कमळ पत्रा वरील पाण्याला कधी थांब म्हणायच नसतनीसटणार्या क्षणांना कधी जवळ करायच नसतमाणसाच आयुष्य हे असच असतबाकी काही हरवल तरीत्यापेक्षाही जास्त उरलेल असत.
◐•◈•◈•◈•◈•◈•◈•◈•◈•◈•◈•◈•◈•◈•◈•◈•◐
काही नाती बांधलेली असतात...
ती सगळीच खरी नसतात...
बांधलेली नाती जपावी लागतात...काही जपून ही पोकळ राहतात...
काही मात्र आपोआप जपली जातात...
कदाचित त्यालाच मैत्री म्हणतात...
◐•◈•◈•◈•◈•◈•◈•◈•◈•◈•◈•◈•◈•◈•◈•◈•◐
मोहाच्या नीसटत्या क्षणी...परावृत्त करते ती मैत्री
,...जीवनातल्या कडूगोड क्षणांना...निशब्द करते ती मैत्री,
...जीवनाच्या आंतापर्यंत प्रत्येक पावलला...साथ देते ती मैत्री,
...आणि जी फक्त आपली असते,
...ती मैत्री.