Google
 

Wednesday, June 27, 2007

पुन्हा ढग दाटून येतात, पुन्हा आठवणी जाग्या होतात...
तिचे माझे सारेच पावसाळे, माझ्या मनात भिजून जातात...
पुन्हा पाऊस ओला ओला, पुन्हा पाऊस बांधून झूला...
तिच्याकडले उरले झोके, परत करतो माझे मला...
पुन्हा पाऊस खूप ऐकतो, पुन्हा पाऊस खूप बोलतो...
त्याच्या माझ्या गप्पांमधले तिचे थेंब अलगद झेलतो...
पुन्हा पावसाला सांगतो मी, पुन्हा पावसाशी बोलतो मी...
माझे तिचे आठवण थेंब, पुन्हा पावसालाच मागतो मी..

No comments: