आयुष्य नक्की काय असतं ?
हासर्या फ़ुलावरचं दव असतं..
नाचर्या मुलाचं नाच असतं..
दुखर्या ह्रुदयाचा घाव असतं..
आयुष्य नक्की काय असतं,
समुद्रात चाललेलं दिशाहिनं जहाजं असतं,
किनारा शोधत फ़िरायच असत,
वादळांनी डगमगुन जायचं नसतं.
आयुष्य नक्की काय असत?
ते एक तलम रेशमी वस्त्र असत..
ज्याचे त्यानेच ते विणायच असतपण,
अति ताणायच नसत..
आयुष्य नक्की काय असत?
सतत गुन्तत जाणारे ते एक कोडे असत,
ते ज्याचे त्यानेच सोडवायच असत,
गुन्तून मात्र त्यात पडायच नसत !!
Wednesday, June 27, 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment