काळ्या मातीत मातीत तिफन चालते, तिफन चालते, तिफन चालते ईज थयथय नाचते ढग ढोल वाजवितो, ढोल वाजवितो, ढग ढोल वाजवितो सदाशिव हाकारतो नंदी बैलाच्या जोडीला संग पारवती चाले ओटी बांधून पोटाला सरीवर सरी येती माती न्हाती धुती होते कस्तुरीच्या सुवासानं भूल जिवाला पडते भूल जिवाला पडते वाट राघूची पाहते राघू तिफन हाकतो मैना वाटुली पाहते सर्जा रं माझ्या ढवळ्या रं माझ्या पवळ्या रं माझ्या झोळी झाडाला टांगून राबराबते माऊली तिथं झोळीतल्या जिवा व्हते पारखी साऊली अभिषेकात घामाच्या आसं देवाचं पूजन पिकं हालती डोलती जनू करती भजन गव्हा जोंधळ्यात तवा सोनं चांदी लकाकते जशी चांदी लकाकते कपाशी फुलते चालं ऊनपावसाचा पाठशिवणीचा खेळ लोनी पायाला वाटती मऊ भिजली ढेकळं काळ्या ढेकळात डोळा हिरवं सपान पाहतो डोळा सपान पाहतो काट पायांत रुततो काटा पायांत रुतता लाल रगात सांडतं लाल रगात सांडतं हिरवं सपान फुलतं | ||
गीत | - | विठ्ठल वाघ |
संगीत | - | अनिल-अरुण |
स्वर | - | अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर |
चित्रपट | - | अरे संसार संसार (१९८१) |
Saturday, February 07, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment