केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली मिटले चुकून डोळे हरवून रात्र गेली कळले मला न केव्हा सुटली मिठी जराशी कळले मला न केव्हा निसटून रात्र गेली सांगू तरी कसे मी वय कोवळे उन्हाचे ? उसवून श्वास माझा फसवून रात्र गेली ! उरले उरात काही आवाज चांदण्यांचे ..... आकाश तारकांचे, उचलून रात्र गेली ! स्मरल्या मला न तेव्हा माझ्याच गीतपंक्ती मग ओळ शेवटची सुचवून रात्र गेली ! आता कुशीत नाही ती चंद्रकोर माझी ..... ( हलकेच कूस माझी बदलून रात्र गेली ) अजुनी सुगंध येई दुलईस मोगऱ्याचा ..... गजरा कसा फुलांचा विसरुन रात्र गेली ? | ||
गीत | - | सुरेश भट |
संगीत | - | पं. हृदयनाथ मंगेशकर |
स्वर | - | आशा भोसले |
चित्रपट | - | निवडूंग (१९८९) |
राग | - | दुर्गा (नादवेध) |
Saturday, February 07, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment