चांदण्यात फिरताना माझा धरलास हात ! सखया रे, आवर ही सावर ही चांदरात ! निजलेल्या गावातुन आले मी एकटीच; दूर दिवे कळलावे पडले मागे कधीच; ह्या इथल्या तरुछाया पण सारे जाणतात ! सांग कशी तुजविनाच पार करू पुनवपूर ? तुज वारा छळवादी अन् हे तारे फितूर ! श्वास तुझा मालकंस ! स्पर्श तुझा पारिजात ! जाऊ चल परत गडे, जागले न घर अजून, पण माझी तुळस तिथे गेली रे हिरमुसून तुझिया नयनात चंद्र ! माझ्या हृदयी प्रभात ! | ||
गीत | - | सुरेश भट |
संगीत | - | पं. हृदयनाथ मंगेशकर |
स्वर | - | आशा भोसले |
Saturday, February 07, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment