नाविका रे, वारा वाहे रे, डौलाने हाक जरा आज नाव रे सांजवेळ झाली आता पैल माझे गाव रे आषाढाचे दिसं गेले, श्रावणाचा मास सरे, भादवा आला माझा राऊ मनामंदी बोलुनि गेला धाव घेई बघ माझे मन, नाही त्याला ठाव रे नवा साज ल्यायले मी, गौरीवाणी सजल्ये मी, चांदवा ल्याला माझा जीवू उरामंदी फुलुनी आला नाचते रे बघ माझे तन, संग त्याचा भाव रे | ||
गीत | - | अशोकजी परांजपे |
संगीत | - | अशोक पत्की |
स्वर | - | सुमन कल्याणपूर |
Saturday, February 07, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment