गोरी गोरीपान, फुलासारखी छान दादा, मला एक वहिनी आण गोऱ्या गोऱ्या वहिनीची अंधाराची साडी अंधाराच्या साडीवर चांदण्यांची खडी चांदण्यांच्या पदराला बिजलीचा बाण ! वहिनीला आणायाला चांदोबाची गाडी चांदोबाच्या गाडीला हरणांची जोडी हरणांची गाडी तुडवी गुलाबाचे रान ! वहिनीशी गट्टि होता तुला दोन थापा तुला दोन थापा, तिला साखरेचा पापा बाहुल्यांच्या परी होऊ दोघी आम्ही सान ! | ||
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | श्रीनिवास खळे |
स्वर | - | आशा भोसले |
Saturday, February 07, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment